टीम इंडिया फुटली, रोहित शर्मा भारतात परतला

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघातील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. तर भारतीय संघात फुट पडल्याचे वृत्त देखील माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे भारतीय संघातील फुटीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. असे असतानाचं भारताचा उपकर्णधार आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आपल्या कुटुंबांसह संघाला सोडून भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

भारतीय संघात सध्याच्या घडीला दोन गट असल्याचे वृत्त आले आहे. एका बाजूला कोहली गट आणि दुसऱ्या बाजूला रोहित गट असे गट पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघात एकी नसल्याच समोर आल आहे. विश्वचषकात कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एककल्ली कारभारामुळे खेळाडू नाराज झाले आहेत. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्रींनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर परिणाम झाला आहे, असे वृत्त ‘दैनिक जागरण’ने प्रसिद्ध केले आहे.

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्युझीलंड विरुद्ध हार पत्करत भारतला आपला विश्वचषकातील प्रवास थांबवावा लागला. न्यूझीलंड विरुद्ध भारत केवळ १८ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे संघाला पराभवाच्या खाईत जावे लागले. या पराभवानंतर रोहित शर्माने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून खंत व्यक्त केली होती. तर आता भारतीय संघाच्या मतभेदाची गोष्ट सर्वांसमोर आली आहे. भारतीय संघाला सोडून रोहित मुंबई परतला आहे.