fbpx

संधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही कसोटी मालिकेत स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने मी भारतासाठी कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार आहे, असे म्हटले आहे.

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सलामीची समस्या भेडसावत आहे. कारण शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत.५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने दोन सामने गमावले आहेत. पराभवाची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी भारताचे तिन्ही सलामीवीर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरणे हे देखील प्रमुख कारण आहे.

सलामी करण्याबाबत रोहित म्हणाला की, मलाही कसोटी क्रिकेट खेळायला आवडले असते, पण ते माझ्या हातामध्ये नाही. पण जर संघ व्यवस्थापनाने मला सलामी करण्याची संधी दिली तर त्यासाठी मी सज्ज आहे. संघ व्यवस्थापन जी माझ्यावर जबाबदारी सोपवू इच्छिते त्यासाठी मी तयार आहे. जर मला संधी दिली तर मी सलामीही करू शकतो.

देशात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर

टीम इंडिया खेळणार डे-नाईट कसोटी?