मोहालीमध्ये रोहितचा ‘हिट शो’;भारताचा धावांचा डोंगर

मोहाली – कर्णधार रोहित शर्माच्या डबल सेंचुरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 392 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता .मागच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या रोहितने लकमल, फर्नाडोच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.फर्नाडोच्या 10 षटकात 106 धावा वसूल केल्या. श्रेयस अय्यरनेही जोरदार फटकेबाजी करत रोहित शर्माबरोबर दुस-या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने (88) धावा फटकावल्या. एमएस धोनी (7) धावांवर पायचीत झाला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत शानदार शतक झळकावले. कारकीर्दीतील रोहितचे हे 16 वे शतक असून, कर्णधार म्हणून पहिलेच शतक आहे. रोहितच्या बरोबरीने श्रेयस अय्यरही दमदार फलंदाजी करत असून त्याचेही अर्धशतक पूर्ण झाले आहे.रोहित शर्मा २०८ धावांवर नाबाद राहिला त्याने केवळ १५३ चेंडूंचा सामना केला या वादळी खेळीत  करताना 13 चौकार १२ षटकार ठोकले