रोहितचा अनुष्काला मजेशीर सल्ला

रोहित अनुष्का

टीम महाराष्ट्र देशा- विराट आणि अनुष्काचा शाही विवाहसोहळा नुकताच इटलीत पार पडला .यानंतर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मात्र रोहितने दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय बनल्या आहेत. रोहितने नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस, असे रोहितने या ट्विटमध्ये म्हटले आहे. रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने त्याने अनुष्कालाही शर्मा हे नाव बदलू नकोस असा मजेशीर सल्ला दिला आहे.सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विराटने या मालिकेतून विश्रांती घेतली असल्याने रोहितवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.