रोहित शर्माच्या दमदार द्विशतकाच सर्वच स्थरातून कौतुक !

टीम महाराष्ट्र देशा: भारताचा तडाखेबाज कर्णधार रोहित शर्माने आज मोहाली मध्ये द्विशतक करत अनेक नवीन विक्रम केले आहेत. यानंतर रोहित शर्मावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. विशेष म्हणजे आज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी ऋतिका यांच्या लग्नाचा आज पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून रोहित शर्माने केलेल्या कामगिरीचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग, यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.

माझ्या मित्रा कायम पुढे जा, तुझी इंनिग पाहायला आनंद वाटतो अस ट्वीट करत दस्तुरखुद्द सचिन तेंडूलकरनी रोहितच कौतुक केले आहे. त्याचबरोबर रोहित तुझा आम्हाला अभिमान आहे अस म्हणत वीरेंद्र सेहवागने रोहितच तोंडभरून कौतुक केले आहे. रोहित शर्माने केलेल्या दमदार इंनिगचा सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.