सुशांतसिंग प्रकरणावरून रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

rohit pawar

अहमदनगर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीबाबत सविस्तर सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत.आता राजकीय पक्षांनी देखील व्युव्हरचना आखायला सुरुवात केली असून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

पुढच्या काही महिन्यातच बिहार विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचे बिहार प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पक्षातील सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, भाजपकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत काम पाहतील, असे वृत्त आहे. फडणवीस गुरुवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही उपस्थित असल्याची माहिती आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या एका खूप मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, अशी बातमी आजच माझ्या कानावर आली आहे. त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे असं रोहित यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. सुशांतला न्याय मिळायला हवा, असे आम्हालाही वाटते आहे. त्यामुळे यावर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. सुशांत प्रकरणी तपासाबाबत आपली भूमिका काय असे विचारले असता, याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केले असून पक्षाचे अध्यक्ष बोलल्यावर आपण काय बोलणार? असं ते म्हणाले.

भाजपच्या ढाण्या वाघाने कोरोनाला दिला धोबीपछाड

देवेंद्र फडणवीसांवर भाजप सोपविणार लवकरच मोठी जबाबदारी

‘कोरोनाच्या संकट काळात फडणविसांच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल’