‘अजितदादांविरोधात संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं’

बारामती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारनं काकाच्या समर्थनार्थ उतरल्याच पहायला मिळत आहे. अजित पवार हा राजकारणातील टाकाऊ माल आहे, अशी  टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोहितनंआपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय.

‘उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतले नाहीत. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होऊन सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख (अजित पवारांविरोधातील संपादकीय) लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता’, असा टोला रोहित पवारनं फेसबुकवरून लगावला आहे.

बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या ‘सांभाळा’चा अर्थ काल समजला. आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या, असंच त्यांना म्हणायचं असेल, अशी चपराक रोहितनं लगावली आहे.