Share

Rohit Pawar | “डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय”; त्रिवेदींच्या वक्तव्यावर रोहित पवार भडकले 

Rohit Pawar | पुणे : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.
छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणालेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rhoit Pawar) यांनी भाजपावर टीका केली आहे.

आता डोक्यावरून पाणी चाललं आहे. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

“छत्रपती शिवाजी महाराजांवर आता सुधांशू त्रिवेदी हा भाजपाचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललं आहे. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी रोहित पवार यांनी दिली आहे.

काय म्हणालेत सुधांशू त्रिवेदी?

“सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या :

Rohit Pawar | पुणे : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune