fbpx

आता वेळ लढण्याची आहे; पार्थच्या उमेदवारीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादी मध्ये राष्ट्रवादी पक्षा कडून अनेक नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मावळ मधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा मतदार संघातून स्वतःची उमेदवारी रद्द करत मावळ मधून पार्थ पवार यांना संधी दिली. शरद पवार यांच्या निर्णयाचे सर्वच राजकीय स्तरातून स्वागत झाले तर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत ‘आता वेळ लढण्याची आहे’ अस म्हणत पार्थ यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

रोहित पवार आपल्या पोस्ट मध्ये असे म्हंटले आहेत की, “आपल्या पक्षामार्फत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या दोन यादीतील उमेदवारांचे मनापासून अभिनंदन.बंधु पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आल्याचा विशेष आनंद आहे. पार्थ पवार नक्कीच मोठ्या मत्ताधिक्याने निवडून येतीलच, सोबत मावळ परिसरात विकासकांमांना नवी दिशा देखील मिळेल.आत्ता वेळ लढण्याची आहे, सर्वजण मिळून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करुया. याचसोबत काँग्रेस सह इतर मित्रपक्षांना मनापासून शुभेच्छा.”