उच्च न्यायालयानं समन्स बजावल्या नंतर रोहित पवार म्हणतात…

rohit dada

टीम महाराष्ट्र देशा : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं आहे. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे.

आता न्यायालयानं या प्रकरणावर रोहित पवार यांना समन्स बजावत त्यांना १३ मार्चपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित यांच्याविरोधात पराभूत झालेल्या राम शिंदेंनी याचिकेत काही आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

या याचिकेत शिंदे म्हणतायेत, निवडणुक काळात रोहित पवार यांनी स्वतःची मालकी असलेल्या साखर कारखान्यातल्या १०० कर्मचाऱ्यांचा वापर करुन पैशांचं वाटप केलं. यातील काही कर्मचाऱ्यांना आपण रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं असा दावाही राम शिंदेंनी सदर याचिकेत नमूद केलं असल्याची माहिती आहे.

व्हॉट्स अपच्या माध्यमातून प्रचार करत मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील राम शिंदे त्यांनी या याचिकेत केला असल्याची माहिती आहे.मी प्रामाणिकपणे निवडणूक लढलो. लोकांनी आपल्या ताब्यात ती निवडणूक घेतली होती. त्यामुळे जो निर्णय होता तो लोकांचा निर्णय होता. तरीसुद्धा भाजपचे पराभवी उमेदार राम शिंदे कोर्टात गेले. जसा त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तसाच आमचाही आहे. मात्र, यातून काही निष्पण्ण होणार नाही, असा विश्वास मला वाटतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाहीत. लोकांच्या बोलण्यानुसार कळतंय की, राम शिंदे कोर्टात गेले आहेत. कशासाठी गेले आहेत? त्यांनी काय मुद्दे मांडले? हे एकदा नोटीस हाती लागल्यावर समजेल. त्यानंतर मी यावर भाष्य करेन. मात्र, सध्यातरी समन्य माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही, असंही  पवार यांनी सांगितलं आहे.

IMP