‘राजकारणात नाटक करणारे टिकत नाहीत, मला नाटक जमत नाही’

बुलडाणा : ‘सरकार कुठलही असलं तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजेत. सर्वांच्या अपेक्षा सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. याबाबत माझं अजिबात दुमत नाही. दोन सरकारांमधला फरक इतकाच आहे की, हे सरकार आपलं सरकार आहे आणि ते सरकार ‘पुन्हा येईल, पुन्हा येईल’ म्हणणारं त्यांचं सरकार आहे,’ असे राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडे मतदारसंघाचे आमदार रोहित पवार म्हणाले.

राजर्षी शाहू महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी या ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील युवक, युवतींच्या प्रश्नांना रोहित पवार यांनी उत्तरे दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मला नाटक जमत नाही. राजकारणात जे नाटक करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत,’ असे ते म्हणाले.

Loading...

ते म्हणाले, ‘माझा स्वभाव फार वेगळा आहे. मी आहे तसा आहे. मी दाखवत नाही. मला खासकरुन अॅक्टिंग जमत नाही. मला नाटक जमत नाही. राजकारणात जे नाटक करतात ते जास्त दिवस टिकत नाहीत. हे माझं मतं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण सर्वांनी हे बघितलं आहे,’ असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, ‘कितीही मोठे झालात तरी अहंकार येऊ देऊ नका. तो आला तर दिल्ली आणि महाष्ट्रसारखं होतं. अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतंच पाहिलंय,’ असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका