Share

Rohit Pawar | “मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, मात्र…”; रोहित पवारांचा खोचक टोला 

Rohit Pawar | कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सीमाभागावर वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. दरम्यान यावर राज्यातील काही नेते सीमाभागातून बेळगावला जाणार असल्याचे सांगितल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आता बेळगावात गेले आहेत.

रोहित पवार यांनी बेळगावहून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमचे नेते 19 तारखेला जो आदेश देतील तो पाळला जाईल, ज्या कोणत्या नेत्याला बेळगावला जाण्यास सांगतात त्याचे पालन करतील, असेही नमूद केले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे रोहित पवार म्हणाले. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना मिश्किल टोला लगावला आहे.

दरम्यान बेळगाव दौऱ्यावर असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी रोहित पवारांनी चर्चा केली. हा आपल्या अस्मितेचा लढा असल्याची भावना सर्वांनी बोलून दाखवली आणि त्या भावनेशी मी सहमत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Rohit Pawar | कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सीमाभागावर वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा …

पुढे वाचा

Kolhapur Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now