Share

Rohit Pawar | दिवाळी पहाट कार्यक्रमावरून रोहित पवारांचा शिंदे सरकारला टोला

मुंबई : आपण पाहिलं असेल की, दसरा मेळाव्याच्या मैदानापासून ते अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीच्या नाव आणि चिन्हांसाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात किती संघर्ष होता. अशातच काही दिवसातच दिवाळी येणार असून, दिवाळी पहाट कार्यक्रमावरूनही शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमने-सामने बिडणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

दसरा मेळाव्याच्या वेळीही शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठी हट्ट धरला होता. त्यावेळी त्यांनी मोठ्या मनाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेऊ द्यायला हवा होता. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेलं. अंधेरी निडवणुकीच्या उमेदवारीवरूनही त्यांनी हाच प्रकार केला. अखेर न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजुने निकाल दिल्यानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. मात्र, आता दिवाळी पहाट कार्यक्रमासाठीही न्यायालयात जावं लागेल की काय, अशी परिस्थिती आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर न्यायालयात जावं लागत असेल, तर जनता निडणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देईल. मोठ्या मनाचे लोक निवडून येतील आणि सारखं आडवाआडवीचे काम करणाऱ्यांचा पराभव होईल, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे गटावर प्रहार केला आहे.

तसेच, राज्य सरकारने ८३० कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्यावरूनही रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. “राज्य सरकारने ज्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यापैकी बरेच प्रकल्प हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदार संघातले आहे. यामध्ये रस्ते, शाळा, मंदिरे यासारख्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी जर हे पैसे खर्च झाले असते, तर सर्वसामान्यांची अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली असती. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू, याची सुरुवात बारामतीतून करावी लागेल,असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : आपण पाहिलं असेल की, दसरा मेळाव्याच्या मैदानापासून ते अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीच्या नाव आणि चिन्हांसाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now