मुंबई: सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यात ट्विटर वार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरच रोहित पवार हे अजून लहान असून चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया द्यायला शरद पवार आणि अजित पवार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सल्ला देऊ नये, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. यावरच आता रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात? https://t.co/gcmhu6gVXU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2022
तसेच मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात. आणि हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठंही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरंतर आपण सर्वांनीच जपायला हवी. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या…”, शरद पवारांनी सांगितली ‘ती’ आठवण
- “…त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली”, शरद पवारांनी सांगितली बाळासाहेबांशी संबंधित आठवण
- “ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्यांना बाळासाहेबांनी…”, शरद पवारांचे मोठे विधान
- जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे?; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
- IPL 2022 KKR vs LSG : झुंजार कोलकाताची ‘एक्झिट’..! लखनऊनं ‘थ्रिलर’ मॅचमध्ये मारली बाजी; प्लेऑफमध्ये केला प्रवेश!