शिखर बँक घोटाळ्यात रोहित पवार यांचेही नाव , ‘या’ भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

rohit pawar fb post for sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा;- शिखर बॅँकेच्या ज्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश आहे, त्याच प्रकरणातील एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत संचालक असलेल्या रोहित पवार यांच्या नावाचादेखील समावेश असल्याचे नाबार्ड, कॅग आणि रिझर्व्ह बॅँकेच्या अहवालात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी बुधवारी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

राज्य सरकारने या संपूर्ण घोटाळ्याबाबत एक समिती गठित करून दिलेल्या अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्या प्रकरणातील एका कारखानाच्या खरेदी प्रकरणात संचालक असलेल्या रोहित यांचं नाव आहे, असं सोमय्या म्हणाले यानी म्हटले आहे .त्यामुळे संपूर्ण पवार कुटूंबच या घोट्याळ्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ईडीच्या अहवालात शरद पवार यांचं नाव आल्याने दुख: झाल्याचं कारण सांगत अजित पवार यांनी राजीनामा दिला. मात्र खरं राजीनामानाट्य चौकशी झाल्यानंतच समोर येईल, असा टोलाही सोमय्या यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या