मुंबई: “माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.”, असा संताप राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल व्यक्त केला होता. आज त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
“कर्जतमध्ये दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मविआ सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. परंतु सध्या या निर्णयास स्थगिती देण्यात आली असून ती उठविण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून रोहित पवारांनी केली आहे.
कर्जतमध्ये दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास #मविआ सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. परंतु सध्या या निर्णयास स्थगिती देण्यात आली असून ती उठविण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांना भेटून केली. https://t.co/rvj03fzuxZ pic.twitter.com/ET6QXUrPxB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2022
धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल….
कर्जतमधून दाखल होणाऱ्या दिवाणी दाव्यांची संख्या मोठी असून त्यातील अनेक दाव्यांसाठी ६५ कि.मी. प्रवास करुन अहमदनगर येथे जावं लागतं. त्यामुळे कर्जतला वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची गरज आहे. याबाबत धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही, पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे माझ्या मतदारसंघात अनेकजण आहेत. कदाचित मी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या दिवाणी न्यायालयाच्या बाबतीतही श्रेय घेण्यासाठी असे लोक पुढं यायला कमी करणार नाहीत. अशी टीका रोहित पवारांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : ऋषभ पंतने सामनावीर म्हणुन भेटलेले ‘हे’ खास बक्षीस दिलं रवी शास्त्रींना; पाहा VIDEO!
- Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! – अमोल मिटकरी
- Ramdas kadam : सेनेला पुन्हा धक्का, रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा
- CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी
- Kishore Patil : शिवसेनेसारखी भाजपाची परिस्थिती होऊ नये यासाठी किरीट सोमय्यांना समज द्यावी – किशोर पाटील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<