मुंबई: राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) निशाणा साधत टोला लगावला आहे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की,’नकली घोड्यावर बसून सामाजिक दुहीचा सूर आळवणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो. पण ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली’ या लावणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राण फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने ‘प्रतिष्ठित’ नाहीत. कथा, लोकवाङमय, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गण, गवळण, प्रवास वर्णन अशी विपुल साहित्य सेवा केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करत रोहित पवार यांनी अभिनेत्री कंगना रनौतलाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
दरम्यान रोहित पवार यांनी आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करण्याची मागणी करून केंद्रातील सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील चर्चेचा विषय ठरू शकतो. तर दुसरीकडे आपल्या बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनालाही रोहित पवार यांनी निशाण्यावर धरले आहे. या अगोदर कंगना रनौत हिने भारतीय स्वातंत्र्यलढयाबाबत बेताल वक्तव्य करत वाद निर्माण केला होता. आता रोहित पवार यांच्या अप्रत्यक्ष टीकेला कंगना काय प्रतिउत्तर देते हे पाहणेही उत्सुकाचे ठरणार आहे. तसेच भाजप रोहित पवार यांच्या मागणीला कितपत गंभीर घेते तेही आता उत्सुकाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- बाळ धनंजय… म्हणून माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो-धनंजय मुंडे
- “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<