Share

Rohit Pawar | रोहित पवारांचा गनिमी कावा, बेळगावात दाखल! शिवरायांच्या पुतळ्याला केले अभिवादन

Rohit Pawar | बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. शिंदे – फडणवीस सरकारमधील दोन मंत्री कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार होते, मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलावा लागला. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे लोकांशी चर्चा करण्यासाठी कर्नाटकातील बेळगावी येथे जात होते. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगाला न येण्याची धमकी दिली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे गनिमी कावा करत बेळगावला गेले आहेत.

रोहित पवार यांनी गनिमी काव्याने बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन उद्यानातील आपल्या मराठी अस्मितेचे मानबिंदू ,आपले आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, “आमच्या सोबत रमाकांत कोंडुस्कर दादा व स्थानिक मराठी बांधव देखील उपस्थित होते. रमाकांत दादांनी २०२१ मध्ये बेंगळुरू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात अनेक मराठी भाषिकांना अटक झाली होती, रमाकांत दादांना तब्बल पन्नास दिवस जेलमध्ये राहावे लागले होते होते.”

यावेळी रोहित पवार यांनी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी रोहित पवारांनी चर्चा केली. हा आपल्या अस्मितेचा लढा असल्याची भावना सर्वांनी बोलून दाखवली आणि त्या भावनेशी मी सहमत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Rohit Pawar | बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now