आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदेना त्यांची जागा दाखवून देऊ : रोहित पवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपा नेते राम शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून देऊ असा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली असतानाच राज्यातील सर्व पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपा नेते राम शिंदे यांना आगामी काळात स्वतःचे पद धोक्यात असल्याची चिंता लागली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडला नाही. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राम शिंदेनी माझी धास्ती घेतली असल्याने लोकसभेचा प्रचार सोडून ते तालुक्यातच फिरत राहिले. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर बोलतांना भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत. असेही त्यांनी म्हंटले. रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधान आले आहे.