Share

Rohit Pawar | “अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका 

Rohit Pawar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यांनतर विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे.

“वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?” असा प्रश्न रोहित पवार यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

तसेच “रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”, असा प्रश्नही रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

“महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही”, अशा शब्दात रोहित पवारांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Rohit Pawar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना …

पुढे वाचा

Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now