मुख्यमंत्र्यांचे ‘फोडा आणि राज्य करा’चे राजकारण : रोहित पवार

टीम महाराष्ट्र देशा: निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘फोडा आणि राज्य करा’ असं राजकारण करत आहेत अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घराणेशाहीवर बोलायचे असेल तर त्यांना सुजय विखे, रणजीत मोहिते कशाला पाहिजेत? अशा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. ज्यात ते घराणेशाही, शरद पवारांवर बोलले होते त्यालाच प्रतिउत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी घराणेशाहीवर बोलताना तुम्ही कसं वागता हे देखील बघायला पाहिजे असं रोहित पवार म्हणाले.

मागच्या निवडणुकीत भाजपचा अजेंडा हा केवळ विकास होता. त्यामुळे जनतेला देश पुढे जाईल, विकास होईल असं वाटत होतं. मात्र, भाजपाने सोशल मीडियाचा वापर करुन खोट्या बातम्या पसरवल्या आणि निवडून आले. मात्र, आता भाजपच्या नेत्यांच्या भाषणात ‘विकास’ हा शब्द देखील येत नाही असं देखील ते म्हणाले.