‘दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे, हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल’

rohit pawar

नगर-  दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीने आंदोलनात उडी घेतली आहे.

जुलैपासुन महायुतीसह अनेक शेतकरी संघटनांनी दुधाच्या भावासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर, काही दिवसांची मुदत देत सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा बडगा उगारला आहे.

महायुतीचे नेते व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दुधाचा अभिषेक केला. ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची राज्य सरकारला सुबुद्धी दे बा…विठ्ठला’ असे पांडुरंगाच्या चरणी साकडे यावेळ घालण्यात आले.

दरम्यान, दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोन-तीन बैठका झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले आहे. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे. भाजपने याविरोधात आंदोलन करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’

सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले खंडन