Share

Rohit Pawar | “लहान मुले चॉकलेटसाठी रडतात, तसे…”, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. दिवाळी (Diwali) सुरू झाली असल्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आतापासूनच एकमेकांवर बॉम्ब फोडायला सुरूवात झाली आहे. आपल्याला माहित आहे की, विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली असते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) पक्षाचे नेते राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर सडकून वार केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार (Rohit Pawar)

राम शिंदेंनी माझ्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. लहानपणी छोटे मुलं चॉकटेलसाठी रडतात, तसे आमचे विरोधक करत आहेत. मात्र, कारखाना सुरु करून शेतकऱ्यांना आम्ही मदत करत आहोत. माझ्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले. पण, राज्यात पडलेल्या ओला दुष्काळाबाबतही एखादे पत्र द्यायला हवे होते, असं म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यातील यावर्षीचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तरीही रोहित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अॅग्रो कारखान्याने त्यापूर्वीच हंगाम सुरु केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती.

त्यावर शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यास क्लिनचीट दिली होती. त्यानंतर राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. तसेच, साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी राम शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. दिवाळी (Diwali) सुरू झाली असल्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आतापासूनच एकमेकांवर बॉम्ब …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now