मुंबई: राज्यात सध्या मविआ विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पेटताना दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. राज ठाकरे भाजपच्या वळणावर असून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मविआ सरकारने म्हटले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
“मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यासाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 21, 2022
कुणाला वाटंत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल किंवा काहींना वाटंत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी! असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ST कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय?; संजय राऊतांचा सवाल
- “…आणि ‘लाल परी’ मुक्त झाली! गाढवांचे काय?”, ‘सामना’तून संजय राऊतांचा प्रहार
- “५ कोटी द्या; अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करणार”, धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
- “सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर…”, संजय राऊतांचा प्रहार
- IPL 2022 DC vs PBKS : पंजाब किंग्जचा फुसका बार..! दिल्लीनं सहज जिंकला सामना; वॉर्नरची हॅट्ट्रिक!