Rohit Pawar | मुंबई : टाटा-एअरबसने विमान निर्मिती प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याच्या वादावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आमचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प जात आहेत, असे खोटे आख्यान तयार केले जात आहे. हे खरे नाही. प्रकल्पांच्या तोट्यासाठी मागील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांवर देखील निशाणा साधला.
“आमचं सरकार सत्तेत येऊन तीन महिने झालेत. तरीही महाराष्ट्रातून उद्योग राज्याबाहेर चाललेत, असा फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. हा फेक नेरेटिव्ह तयार करण्यामध्ये काही राजकीय पक्ष आणि काही HMV पत्रकार एकत्रितपणे महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. काही HMV पत्रकार सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. सरकारच्या विरोधात प्रचार करत आहेत”, असे फडणवीस म्हणाले. यावर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच #HMV म्हणजे #He_is_Maharashtra's_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 1, 2022
रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच HMV म्हणजे He_is_Maharashtra’s_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि WMV म्हणजेच We_Are_Maharashtra’s_Voice व्हावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Anil Desai । “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून पलटवार
- Ashok Saraf | “अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि…” ; ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरे यांचे गौरवउद्गार
- Nilesh Rane | “विरोधी पक्षनेते एक शब्दही बोलत नाहीत, दोन्ही काँग्रेसने ठाकरेंना…”, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र थंडीची लाट, तर पुण्यात कमाल तापमानाची नोंद
- Breaking News | शिवसेना कोणाची? ४ आठवड्यानंतर होणार पुढील सुनावणी