fbpx

मग रोहित पवार ‘त्या’ कौटुंबिक बैठकीला नव्हते का ?

ncp supremo sharad pawar, rohit pawar and parth pawar

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढ्यातून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शेकाप तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. तसेच एकाच कुटुंबातील तीन उमेदवार नको, म्हणून परिवारात चर्चा झाल्याचं देखील श्री पवार म्हणाले होते.

दरम्यान, पवार साहेबांनी आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची मागणी त्यांचे दुसरे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे एका बाजूला कुटुंबात चर्चा करून निर्णय घेतल्याचे शरद पवार यांच्याकडून सांगितलं जात असताना, रोहितकडून  पुर्नविचार करण्याची मागणी होत  असल्याने ते कौटुंबिक बैठकीत नव्हते का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर खुद्द पवार यांनीच आपल्या घरातून केवळ सुप्रिया सुळे आणि मी लढणार असल्याचे सांगितले होते. श्री पवार यांनी पार्थच्या उमेदवारीला ब्रेक दिल्याचं बोलल गेल. रविवारी निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र चक्र फिरली असून शरद पवारांनी अचानक यू-टर्न घेत, एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवायची?, यावर कुटुंबात विचार झाल्याचं सांगितले. तसेच नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सूतोवाच केलं.

एका बाजूला शरद पवार हे घराणेशाहीचा आरोप लागू नये म्हणून काळजी घेत असल्याचं पहायला मिळत आहेत, तर रोहित पवार हे पुनर्विचार करण्याची मागणी करत असल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. काल पवारांनी स्वतः कौटुंबिक चर्चेनंतर माघार घेत असल्याचं जाहीर केलं असताना रोहित यांनी केलेली मागणी म्हणजे पवार घराण्यात अंतर्गत मतभेद आहेत का ? हा प्रश्न देखील उपस्थित करणारी आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

2 Comments

Click here to post a comment