Share

Rohit Pawar | भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यावरून रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले…

Rohit Pawar | पुणे : सोमवारी मध्यरात्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेक करण्यात आली. यावेळी स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेक नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केलं आहे.

रोहित पवार यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भास्कर जाधव  सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यामुळे जर त्यांच्या घरावर हल्ला होत असेल, तर ते योग्य नाही. कोणीतरी एक आमदार येतो, हवेत गोळ्या घालतो, कोणी सरकार विरोधात बोलत असेल तर त्यांच्या घरावर गुंड हल्ले करतात, असे प्रकार आपण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही बघितले नाहीत, हे आज बघावं लागते आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर लोक निवडणुकीच्या माध्यमातून देतील, असं म्हणत रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

तसेच, एका मुलाखती दरम्यान रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकते, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरही ते बोलले आहेत.आज राज्यात आपल्याला फोडाफोडीचं राजकारण बघावं लागतं आहे. हे राजकारण सामान्य जनतेला आवडत नाही. एक मोठा पक्ष शिवसेना फुटताना आपण बघितला आहे. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष कोणता, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे विरोधक आता राष्ट्रवादीकडे बघतील अस मला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे.

दरम्यान, झालेल्या हल्ल्यांनंतर भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप केले आहेत. अचानक माझी सुरक्षा काढण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी अपेक्षा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Rohit Pawar | पुणे : सोमवारी मध्यरात्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेक करण्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now