अहमदनगर: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी कोरोनाच्या तावडीत सापडत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.
कोरोनामुक्त होताच आमदार रोहित पवार थेट कर्जत नगरपंचयात निवडणुकीच्या मैदानात पोहोचले. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. यावेळी त्यांनी तेथील नागरिकांची भेट घेतली. तसेच लोकांमध्ये आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते. विधानसभेला कार्यकर्ते माझ्यासाठी पळाले. आता त्यांच्यासाठी लोकांना विनंती करणं माझं काम आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
कोरोनातून बरं झाल्यानंतर आज कर्जतमध्ये नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ उतरलो यावेळी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला. pic.twitter.com/uFH3n2euck
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2022
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजपने केलेल्या टीकेला देखील यावेळी रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा पवार साहेब जनतेमध्ये मिसळून त्यांची मदत करताना दिसतात. कोरोनाच्या काळात एकही दिवस घरी न बसता त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार दिला. याच सोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत पवार म्हणाले, त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीचं नसल्याने ते अशा पध्दतीची टीका शरद पवारांवर वारंवार करत असतात.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बेकायदेशीर नियुक्ती; पाटील यांना धमकीचे फोन!
- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप? ; जाणून घ्या कारण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<