Share

Rohit Pawar | “हिंमत असेल तर पुरावा द्या..मैदानात बघू”; रोहित पवारांचे ‘या’ नेत्याला आव्हान

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सतत सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. राम शिंदे (Ram Shinde) यांनी ‘माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून रोहित पवारांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले’, असं म्हटलं होतं. रोहित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार (Rohit Pawar)

ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू?, असा सवाल करत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर पलटवाल केला आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावरही अप्रत्यक्षपणे पलटवार केला आहे.

राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोकं स्विकारत नाहीत. हिंमत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू!, असं आव्हान रोहित पवारांनी राम शिंदे यांना केलं आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे सगळं म्हटलं आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी अहमदनगरमध्ये बोलताना रोहित पवारांवर केली होती. येत्या 2024 ला हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ आपल्याला साफ करायचा आहे. एका ठिकाणी जनशक्ती आहे तर एका ठिकाणी धनशक्ती आहे. त्यांना वाटतं धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र विकत घेऊ आणि अमेरिकेला जाऊ,असं सावंत यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सतत सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now