Share

Rohit Pawar | “…तर आम्ही सत्तारांचं विधान विसरून जाऊ”, अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar | मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय संतापजनक वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकारण चांगलच तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर राजकीय वर्तुळात देखील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

सत्तार यांचं हे संतापजनक वक्तव्य आहे, त्याचा निषेध करतो. सत्ता डोक्यात नाही गेली पाहिजे. आम्ही आता शांत आहोत पण कायमच शांत राहू अस नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी थेट इशारा दिला. तसंच, ओला दुष्काळ जाहीर केला तर आम्ही त्यांचे वक्तव्य विसरून जाऊ, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, अब्दुल सत्तार यांचं हे संतापजनक वक्तव्य आहे, त्याचा निषेध करतो. सत्ता डोक्यात नाही गेली पाहिजे. आम्ही आता शांत आहोत पण कायमच शांत राहू असं नाही. कुठल्या तरी पार्टीचा बदला घ्यायचा म्हणून हे सरकार आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्याची दखल घ्यावी, असं देखील पवार म्हणाले.

अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्र बाहेर चालले आहेत त्यामुळे बेरोजगार होत आहे. बदला घेण्यासाठी तुम्ही पक्ष फोडता आणि सत्तेत येता. मग सर्व सामान्य लोकांचे काय? खोक्याची देवाणघेवाण करता. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे पवारांविरोधात बोलायची स्पर्धा लागली आहे. हे लोक पदासाठी बोलत आहेत, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

Rohit Pawar | मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय संतापजनक वक्तव्य …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now