रोहित पवारांच्या उमेदवारीला गटबाजीचे विघ्न, घोंगावतंंय दुहेरी संकट

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांची कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचण्याची मोहीम राबवली आहे. मात्र त्याच्या उमेदवारीवर आता गटबाजीचे विघ्न निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्‍यता असून मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने देखील त्याचा फायदा घेवून या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अतोनात मेहनतीवर पाणी तर फेरलं जाणार नाही ना ? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी महिला सक्षमीकरण करून महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिलं. त्यामुळे अनेक महिलांना राजकारण व समाजकारणा मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आज कर्जत-जामखेड़ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारीची मागणी केली.पक्षाने संधी दिली तर नक्कीच या संधीचे सोने करेल. अस सांगत त्यांच्याच पक्षातील महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी कर्जत जामखेड साठी आपला ठाम दावा ठोकला आहे. तर याचाच फायदा घेत मित्रपक्ष कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी देखील या जागेसाठी जोरदार दावा केला आहे.

त्यामुळे आता रोहित पवार यांच्या उमेदवारीवर दुहेरी संकट घोंगावत आहे. कर्जत जामखेड मतदार संघात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या प्रा.राम शिंदे यांच्याबरोबर लढत असल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर मोठे आव्हान आहे. काही दशकांपूर्वी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. आघाडीमध्ये ही जागा कॉंग्रेसची राहिल्याने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी या जागेवर जोरदार दावा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचा दावा त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पवार यांच्या उमेदवारीस हा मोठा अडथळा मानला जात आहे.

तर दुसरीकडे अनेक दशके कुळधरण गटावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या गुंड यांनीही उमेदवारीसाठी जोरदार दावा केला आहे. या मतदारसंघासाठी कर्जत तालुक्‍यातील अनेक उमेदवार असावा अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. शरद पवार यांच्याकडून राजकारणात महिलांना प्राधान्य दिले जात असल्याने आपली उमेदवारी निश्‍चित असल्याचे गुंड सांगत आहेत. गुंड यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे. त्यांचे पती पंचायत समितीचे सदस्य असून त्यांना मानणारा कर्जत व जामखेड तालुक्‍यात मोठा वर्ग आहे. त्यांचे सासरे बापूसाहेब गुंड हे तालुक्‍यातील राजकारणाची चाणक्‍य म्हणून ओळखले जातात.

आता या सगळ्या सावळ्या गोंधळात रोहित पवार कशी मोट बांधतात आणि सगळे गट एकत्र करून निवडणुकीला सामोरे जातात हे मात्र पाहण्यासारख असणार आहे. तर दुसरीकडे मंजुषा गुंड यांना उमेदवारी नाही मिळाली तर त्या काय भूमिका घेणार यावर कर्जत जामखेड मतदार संघाचे पुढचे गणिते अवलंबून असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

# पक्षांतर : पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले : रोहित पवार

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी

शिवसेनाचं काय विरोधकांनाही वाटतं देवेंद्र फडणवीसांनीचं मुख्यमंत्री व्हावं : राम कदम

आम्ही सोबतच, १५ दिवसांत जागावाटपाबाबत निर्णय घेणार : देवेंद्र फडणवीस