fbpx

शरद पवारांबरोबर नातू रोहित पवार दुष्काळ दौऱ्यावर ‘ऍक्टिव्ह’ पण पार्थ पवारांचा पत्ताच नाही

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळी दौरा करत आहेत. मात्र या दौऱ्यांमध्ये पवारांसह सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत ते त्यांचे नातू रोहित पवार. गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार हे पवारांसोबत अनेक दौऱ्यांमध्ये दिसून आले आहेत.

कोकण दौरा, वाघा बॉर्डर असो किंवा अहमदनगर , बीड मध्ये झालेला दुष्काळ दौरा. या सगळ्यांमध्ये रोहित यांचा असलेला सक्रिय सहभाग हा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन रोहित यांची हि राजकीय लॉंचिंग असल्याचं बोललं जात असलं तरी रोहित हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असल्याने ते पूर्वीच राजकारणात सक्रिय झालेले आहेत. मात्र या सर्व चित्रांमधून अजित पावर यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गायब असल्याचे राज्याने पाहिलं असून याची चर्चा सर्वत्र होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे आणखी एक नातू रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. तसा आग्रहच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. अहमदनगरमधल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते करतायत. हे तेच रोहित पवार आहेत ज्यांनी शरद पवारांच्या निवडणुकीतून माघारीवर सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. तर दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी शरद पवार आणि नातू रोहित पवार नगरमध्ये गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केलीय. कर्जत परिसरातल्या काही गावांमध्ये रोहित पवार यांच्या पुढाकारातून पाण्याचे टँकर सुरू आहेत.