उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास रोहन सुभाष देशमुख उत्सुक

सोलापूर- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. भाजपाने उमेदवारी दिल्यास मी  निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर  बोलताना सांगितले.

२०१४ लोकसभा निवडणूकीत आपला पराभव झाला होता त्यावेळी आपण अपक्ष निवडणूक लढविली होती परंतु आगामी २०१९ ला आपण गेल्या काही दिवसांपासून कसून तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे  भाजपाने उमेदवारी दिली तर पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी निवडणूक लढविणार हे सांगत असलो तरी मी केवळ निवडणुका लढण्याच्या दृष्टीने पक्षाच्या कामात आलो नाही गेले ८ वर्षे भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा विस्तार व्हावा यासाठी प्रामाणिक काम करतोय. मंत्र्याचा मुलगा नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून नागरिकांच्या मध्ये जाऊन मदत करतोय, विकासकामे करतोय असं देखील त्यांनी सांगितलं आहे .

भाजपाने आता लोकसभेची उमेदवारी दिली तर पूर्ण ताकतीने सर्वांना सोबत घेऊन भाजपाचा विजय मिळवण्याची ताकद मतदारसंघात आम्ही निर्माण केली आहे. सामाजिक योगदान म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सामुदायिक विवाह सोहळा, रोजगार मेळावे आणि इतर मोठ्या प्रमाणात काम मतदारसंघात सातत्याने सुरु असल्याचे  देशमुख यांनी  सांगितले.

दरम्यान,सध्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून रविंद्र गायकवाड हे विद्यमान खासदार असून मागील २०१४ लोकसभेला मोदी लाटेत त्यांनी माजी खासदार पद्मसिंह पाटील आणि अपक्ष उमेदवार रोहन देशमुख यांचा पराभव केलेला होता.मागील वेळी शिवसेना-भाजप युती असल्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेकडे होता तर भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे रोहन देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. परंतु सध्या परिस्थिती वेगळी असून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची काही दिवसांपूर्वी सांगितले होते त्यामुळे शिवसेनेकडून विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी मिळेल तर भाजपाकडून विधानपरिषद आमदार सुजितसिंह ठाकूर आणि रोहन देशमुख यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील तसेच त्यांची सूनबाई  अर्चना पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

हे सर्व असताना मात्र रोहन देशमुख यांनी कार्यक्रम, दौरे, सामाजिक उपक्रम व वैयक्तिक भेठीगाठीचा सपाटा लावल्याचे पहायला मिळत आहे. कासवगतीने लोकमंगल करत निघालेले रोहन देशमुख येणाऱ्या २०१९ च्या निवणुकीत लोकसभा गाठतील का हा मात्र औत्सुक्याचा विषय आहे.

वडिलांच्या उमेदवारीसाठी कन्या हर्षदा देशमुख मैदानात

मराठा आंदोलकांनो सबुरीने घ्या : सुभाष देशमुखLoading…
Loading...