माढा : भाजप उमेदवारीसाठी नवीन ट्वीस्ट, रणजितसिंहांच्या ऐवजी रोहन देशमुखांचे नाव आघाडीवर

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत पवारांना साथ दिली आहे. भाजपकडून मोहिते पाटील तर राष्ट्रवादीकडून शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून उमेदवारीसाठी नवीन ट्वीस्ट निर्माण झाले असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचा नावाचा विचार केला जात आहे.

रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी कोणताही शब्द देण्यात आलेला नाही, तसेच स्वतः मोहिते पाटील यांनी देखील उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार रणजितसिंह यांना माढा विधानसभेतून लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. तर सुभाष देशमुख यांचे चिरंजीव आणि लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या नावाचा विचार पक्षाने सुरु केला आहे.

Loading...

सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांना होणार विरोध पाहता रोहन देशमुख हेच योग्य उमेदवार असल्याचं भाजप नेतृत्वाकडून बोलल जात आहे. मोहिते पाटील यांना जिल्ह्यामध्ये ताकद देत जिल्ह्य परिषदेच्या सत्तेत वाटा देण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. स्वतः रणजितसिंह यांनी देखील देशमुख यांच्या नावाला होकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...