fbpx

संजय शिंदे म्हणजे माढ्यासाठी राष्ट्रवादीचा बळीचा बकरा – देशमुख

टीम महाराष्ट्र देशा- रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांना उमेदवारी दिलीय आहे. तर भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. रोहन यांनी देखील मैदानात उतरण्याची जोरदार तयारी करत संजय शिंदे म्हणजे माढ्यासाठी राष्ट्रवादीचा बळीचा बकरा, अशी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याने त्यांच्या पक्षाचे मनोधैर्य खचल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच संजय शिंदे यांना लोकसभेसाठी बळीच बकरा बनवण्यात आलं असल्याची टीका रोहन देशमुख यांनी केली आहे.आपण भाजपमधील एक कार्यकर्ता असून पक्ष जी जबाबदारी देईल, त्यासाठी तयार असल्याचं देखील देशमुख यावेळी म्हणाले.

कोण आहेत रोहन देशमुख?
रोहन देशमुख हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र आहेत, तर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे ते जावई आहेत. लोकमंगल मल्टिस्टेट कॉ-सोसायटीचे ते प्रमुख आहेत. परदेशात उच्च शिक्षण घेतलेल्या रोहन यांनी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकमंगल समूहाच्या माध्यमातून काम उभारले आहे.