गुवाहटीमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बस वर दगडफेक

नवी दिल्ली: गुवाहटी मध्ये भारत-ऑस्ट्रेलियाच्या दररम्यान झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम हॉटेल मध्ये परत जात असताना त्यांचा टीम च्या बस वर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दगडफेकीने बस च्या काचा फुटल्या आहेत.

याबाबतची माहिती ऑस्ट्रेलियन फलंदाज एरॉन फिंच याने ट्विट करून दिली आहे. त्याने लिहले आहे की, “हॉटेल मध्ये जाताना बसवर दगड फेकला गेला.हे खूप भयावह होते.”

दरम्यान, काल झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेट्स ने पराभूत केले आहे. गुवाहटी मध्ये तब्बल सात वर्षानंतर सामना झाला आहे. याआधी येथे २००० साली सामना झाला होता आणि सात वर्षांनी झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडिया चे फॅन्स नाराज होते. त्यापैकी च कोणीतरी हा हल्ला केला आहे.

एरॉन फिंच च्या ट्विट ला ऑस्ट्रेलियन कर्णधार डेव्हिड वॉर्नर ने सुद्धा रीट्विट केले आहे. या सगळ्या घटनेवर अजून तरी बीसीसीआई किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

You might also like
Comments
Loading...