रॉबीन्सनचा वाद पंतप्रधान कार्यालयात; निलंबनाच्या कारवाईवर क्रीडामंत्र्यांनी केली टिका

मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात इंग्लंडकडून ओली रॉबीन्सन आणि जेम्स ब्रेसी यांनी पदार्पण केले. यात रॉबीन्सनने पदार्पणातच ७ गडी बाद करत चमक दाखवली. मात्र दुर्दैवाने २०१२-१३ मध्ये वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विटमुळे रॉबीन्सनचा पदार्पणाचा सामना हाच त्याचा अंतिम सामना ठरला. हे प्रकरण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अतिशय गांभीर्याने घेत रॉबीन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत केले. आता मात्र या प्रकरणात ब्रिटनचे क्रीडामंत्री ओलिवर डाउडेन यांनी हस्तक्षेप करत रॉबिन्सनला समर्थन दर्शवले आहे. इसीबीच्या क्रीडामंत्री डाउडेन यांनी ट्विट करत लिहिले की, ‘रॉबिन्सनने केलेले ट्विट चुकीचे होते. मात्र ज्यावेळी त्याने ही चुक केली त्यावेळी तो लहान होता. ही एक दशकपूर्वीची गोष्ट आहे’

आपल्या ट्विटमध्ये पुढे त्यांनी म्हणले आहे की,’मात्र आता तो मोठा झाला असुन त्याला त्या चुकीची जाणीव झाली त्याने याबद्दल माफी देखील मागितली आहे. इसिबीने त्याच्या निलंबनाच्या कारवाईवर पुन्हा एकदा विचार करावा’ असा सल्ला त्यांनी दिला. आता इसीबी यानंतर काय पाउल उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे. यादरम्यान इसीबीने त्याला काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP