इंधनदरवाढीला विरोध करत रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून गाठले ऑफीस

रॉबर्ट वाद

नवी दिल्ली : कोरोना काळात टाळेबंदी करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस देशात इंधनाचे दर वाढत आहेत. देशातील काही भागात पेट्रोलने शंभरी गाठली असून, डिझेलही उच्चांकी दरावर पोहोचले आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजप याच मुद्द्यावरून कॉंग्रेसवर जोरदार टीका करत होता मात्र आता सत्तेत आल्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने विरोध प्रदर्शन होत असताना रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून आपले ऑफीस गाठत इंधनदरवाढीला विरोध दर्शवला आहे.

दिल्लीतील खान मार्केट ते कार्यालय हे अंतर रॉबर्ट वाड्रा यांनी सायकलवरून कापले. यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ”पंतप्रधान मोदींनी वातानुकुलित आरामदायी वाहनातून बाहेर पडावे आणि सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी समजून घ्याव्यात, असे टोला लगावत सर्वसामान्य जनतेला होत असलेला त्रास पाहून तरी पंतप्रधान इंधनदर नियंत्रणात आणतील, अशी अपेक्षा वाड्रा यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी मागच्या सरकारवर खापर फोडून मोकळे होतात, असा आरोपही वाड्रा यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या