आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी रॉबर्ट वढेरा ईडीसमोर हजर

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वढेरा आज सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. रॉबर्ट वढेरा चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर झाले असून ईडीचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत . वाड्रा यांच्या चौकशीची दुसरी फेरी आज होत आहे आहे. वाड्रा यांचे वकील ईडीच्या कार्यालयात अगोदरच पोहोचले होते.

ईडीने काल देखील वाड्रा यांची चौकशी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, वाड्रा यांच्याकडे त्यांचया लंडनमधील मालमत्तेबाबत माहिती विचारण्यात आली. शिवाय, संजय भंडारी नावाच्या एका उद्योजकाबाबतही त्यांना विचारणा करण्यात आली. ईडीने वाड्रा यांच्याकडे काही ई-मेलबाबतही माहिती मागितली होती.

दरम्यान,यापूर्वी दिल्लीच्या एका कोर्टाने वाड्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, वाड्रा यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केले पाहिजे असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले होते.