‘रोडपती’ असलेले रॉबर्ट वढेरा ‘करोडपती’ कसा झाला?

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वढेरा आज सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. यावरूनच भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी वढेरांना लक्ष्य केले. वढेरा यांनी अनेक कंपन्यांकडून आडमार्गाने पैसा मिळवला. त्यांच्यासारखा ‘रोडपती’ ‘करोडपती’ कसा काय झाला, असा सवाल पात्रा यांनी विचारला. ते बुधवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

भारतीय वायूदलात प्रशिक्षणासाठी वापरण्यात विमानांच्या खरेदी व्यवहारातून रॉबर्ट वढेरा यांनी कोट्यवधींचा नफा कमावला. यूपीए-१ सरकारच्या काळात अशाप्रकारचे पेट्रोलियम आणि संरक्षण खात्याशी निगडीत व्यवहारांच्या माध्यमातून त्यांना प्रचंड दलाली मिळाली. याच पैशातून त्यांनी लंडनमध्ये तब्बल ८ फ्लॅटस खरेदी केल्याचा आरोप याच पत्रकार परिषदेत पात्रा यांनी केला.

दरम्यान,काँग्रेस भवनबाहेर रॉबर्ट वाड्रा आणि राहुल गांधींचा फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले होते. ‘कट्टर सोच नही युवा जोश’ असं लिहीत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. पण कारवाई करत हे पोस्टर हटवण्यात आले. त्यावर ‘मोदी सरकार अतिशय घाणेरडं राजकारण खेळतंय’, असा आरोप काँग्रेसने केला.