देवाचे डोळे चोरीला

पुणे : आजकाल चोर कोणत्या गोष्टीची चोरी करतील याचा अंदाज हि आपण लावू शकत नाही. देवाचे डोळे या जगात घडणाऱ्या सर्व घटना पाहतात अस म्हंटल जात. मात्र एका चोराने देवाचे डोळेच चोरल्याची घटना समोर आली आहे.

दत्तवाडीतील अखिल दत्तवाडी म्हसोबा मंदिरात हा प्रकार घडला आहे. देवदर्शनाच्या बहण्याने चोर मंदिरात शिरला. यावेळी मंदिरातील पुजारी बाहेर बसले होते.तेवढ्यात संधी साधत चोराने आजूबाजूला कोणी नसल्याच पाहून देवाच्या मूर्तीचे डोळेच काढले आणि पसार झाला.

हे संपूर्ण चोरीचे दृश्य मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत होणार आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.