भूम मधील ‘हल्लाबोल’ आंदोलनात चोरट्यांचा ‘डल्ला’

hallabol theft in bhum

टीम महाराष्ट्र देशा- सरकारविरोधात पुकारलेल्या एल्गारामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हल्लाबोल आंदोलन भूम शहरात वेगळ्याच गोष्टीमुळे लोकांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. भूम शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या हल्लाबोल आंदोलनात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं समोर आलं आहे.चोरट्यांनी दोन लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केल्याने एका वेगळ्याच कारणासाठी हे आंदोलन चर्चेत आलं आहे.

‘दैनिक लोकमत’ ने दिलेल्या बातमीनुसार ,बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ करत आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे खिसे साफ केले.संजयकुमार बोराडे यांचे अडीच तोळ्याचे लॉकेट तसेच २५ हजार रुपये,नितीन डोके यांचे ३० हजार रुपये, जयसिंग मनोहर गोफणे २० हजार,अशोक आडे १० हजार,अजिनाथ खेडकर,लक्षमण ढगे,नारायण साबळे यांचे १९ हजार ,१५ हजार,१० हजार रुपये किमतींचे मोबाईल चोरीला गेले आहेत. या सर्वांची एकत्रितरीत्या तक्रार पोलिसात दाखल झाली असून पोलीस तपास करत आहेत.