पुण्यातील खळखट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यावर दरोड्याचा गुन्हा

पुणे: नरवीर तानाजी मालसुरे रस्तावर ( सिंहगड रोड) राजाराम पुलाजवळ काल मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलकांनी फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली होती. आज अंदाजे ४० ते ५० आंदोलकां विरोधात सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हल्ल्याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

गुरुवारी चारच्या सुमारास पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शहरातील काही भागात फेरीवाल्यां विरोधात आंदोलन पुकारले होते. दरम्यान सामान्य नागरिकांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर जर दरोडा आणि हाणामारीचे गुन्हे दाखल केलें जात असतील तर आंदोलने तरी कशी करायची असा प्रश्न मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

You might also like
Comments
Loading...