पुलंच्या घरात लक्ष्मी ऐवजी सरस्वती सापडल्याने चोर पळाले!

पु, ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरी चोरी; मात्र पुस्तकच पुस्तक बघून चोर पळाले

पुणे: साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पु. ल. यांच घर आहे. घर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले. पुलंची हस्तलिखितं आणि पुस्तकं चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यांच्या घरात फक्त आणि फक्त पुस्तकच पुस्तक असल्यामुळे चोरांची निराशा झाली असावी व शेवटी त्यांनी तिथून पळ काढला.

शेजारी राहणाऱ्यांनी याबाबतची माहिती पुलंच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे. त्यामुळे एकंदरीत पुलंच्या घरात लक्ष्मी ऐवजी सरस्वती सापडल्याने चोरांचा भ्रमनिरास झाल्याच दिसत आहे.