आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा भोसरीत आज रोड शो

पुणे : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो भोसरी PMT चौक येथून सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालतील त्यानंतर ते तेथे पत्रकारांशी संवाद साधतील.

हा रोड शो भोसरी चौकातून दिघी रोड, सिद्धेश्वर स्कुल, आळंदी रोड, कै. अंकुशराव लांडगे सभागृह या मार्गावरून ही रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, चिंचवड मतदारसंघातील उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत सभा देखील होणार आहे.

महत्वाच्या बातम्या