प्रीतम मुंडेंच्या हस्ते १ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

टीम महाराष्ट्र देशा :  बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गायकवाड जळगाव येथे १ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटन केले. यामुळे गायकवाड जळगाव येथील नागरिकांच्या समस्या सुटणार असून या गावासाठी पक्का रस्ता तयार होणार आहे.

याविषयी प्रीतम मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी राज्य व केंद्र सरकारमुळे ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण होत आहेत. जनतेच्या अपेक्षांना सार्थ ठरेल असे काम पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही केले आहे.लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अपेक्षांनुसार देणे आमचे कर्तव्य आहे तर गरजेनुसार मागणी करणे हा जनतेचा अधिकार आहे.

तसेच येणाऱ्या येणाऱ्या काळात जिल्ह्यातील उर्वरित प्रश्न निश्चितपणे मार्गी लावून जनतेच्या ऋणांची परतफेड करू असे वचन याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना दिले. याप्रसंगी महिला भगिनींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते अशी फेसबुक पोस्ट केली आहे.

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्याच्या फायदा निश्चितच जनतेला होत आहे.