तब्बल ३५ वर्षांपासून अडकलेला ‘हा’ रस्ता लागला मार्गी! जलवाहतुकही सुरू होणार!

ठाणे/प्राजक्त झावरे-पाटील – डोंबिवली उपनगरातील भोपर परिसरातून कोपर स्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या रस्त्याची अतिशय विदारक अवस्था झाली आहे. तसेच रेल्वेमार्गात भुयारी मार्ग नसल्याने पादचाऱ्यांना मोठा वळसा घालून कोपरला जावे लागते. त्यामुळे या दोन भागांना जोडणारा नवा रस्ता बांधण्यास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.

हा रस्ता प्रत्यक्षात आल्यावर अवघ्या १० मिनिटांत हे अंतर कापणे शक्य होणार आहे. त्यामुळे या परिसराचा विकास अजून गतीने होणार आहे. डोंबिवली पश्चिमेकडील भोपर गाव ते कोपर स्थानक या भागात काही वर्षांपूर्वी फारशी वस्ती नव्हती. मात्र या अवधीत या भागात प्रचंड लोकवस्ती वाढली. त्यामुळे या रस्त्यासाठी ग्रामस्थ सन १९८५ पासून मागणी करत होते. निधीअभावी हा रस्ता मार्गी लागत नव्हता. या पार्श्वभूमीवर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.

 

 

या शुक्रवारी देखील नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना या रस्ते प्रकल्पासाठी निधी देण्याची विनंती केली. दीड किलोमीटरच्या या रस्त्यासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत रेल्वे उड्डाणपुलाचाही समावेश आहे. गडकरी यांनी या रस्त्याला हिरवा कंदील दाखवला असून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेवरील उड्डाणपूल, तसेच खाडीवरील छोट्या पुलासह हा रस्ता केला जाणार आहे. त्यामुळे भोपरवासीयांचा मोठा फेरा टळणार आहे.

जलवाहतूक प्रकल्पासाठी सामंजस्य कराराची लवकरच बैठक

कल्याण-भिवंडीहून ठाणे व मुंबई जलवाहतुकीची अनेक वर्षांपासून चर्चा आहे. त्या दृष्टीने मागे खासदारांनी जलमार्गाची पाहणी करून आराखडा देखील तयार केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि ठाणे महापालिका यांची बैठक बोलावून सामंजस्य करार करावा, अशी मागणीही डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. त्यानुसार लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदारांनी दिली.

व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का? 

‘अच्छे दिन’ वास्तवात कधीच नसतात, ते मानण्यावर असतात- नितीन गडकरी

You might also like
Comments
Loading...