मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

MNS andolan

मुंबई : जागोजागी पडलेल्या खड्डयावरून मनसे चांगलीच आक्रमक झालीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ता खोदत आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळं काही वेळ गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र अशा पद्धतीन मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. सोमवारी रात्री मनसैनिकांनी हे आंदोलन केले.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनाही व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक