शिर्डी – शिंगणापूर रस्ता बनतोय बेकायदेशीर मजुरांचा अड्डा

कोणत्याही पोलीस चौकशी शिवाय परप्रांतीय मजुरांचा राजरोस वावर

राहुरी , (राजेंद्र साळवे) – राहुरी तालुक्यातुन जाणारा नगर-मनमाड़ राज्य महामार्ग व त्या मार्गालगत आपली छोटी मोठी दुकाने थाटुन आपला प्रपंच निटनेटका चालावा म्हणुन बरेच बेरोजगार आपला व्यवसाय करीत आहे.परंतु या व्यवसायीकांच्याकड़े काही परप्रांतीय सुद्धा रोजंदारीवर काम करत आहे.ब-याच वेळेस त्यांच्या कड़े पत्ता विचारल्यास दीशाभुल करणारी उत्तरे मिळत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.या परप्रांतीय नागरीकांमधे काही खरोखर रोजगारासाठी आपले राज्य सोड़ुन आले असतील हे जरी खरे असले तरी त्या ख-या नागरिकांची इत्यंभुत माहीती तालुक्याच्या पोलीस विभागाकड़े दीली आहे काय ? हे तपासणे क्रमप्राप्त ठरणार आहे.असे संशयीत परप्रांतीय नागरीकांची तपासणी करून त्यांचा क्राॅसचेक खुलासा करूनच कामावर ठेवने हे बघणे गरजेचे आहे.
राहुरी तालुक्यातील ब-याच ग्रामीण भागात हे परप्रांतीय नागरीक बांधकाम ठेकेदार, होटेल , सोनार दुकान , बिल्ड़ींग मटेरियल विक्री, तसेच मिठाईची दुकाने, कापड़ दुकान, यासह विविध व्यावसायिकांकड़े हे परप्रांतीय कामगार आहेत.हे कामगार कमी मोबदला घेतात त्यामुळे महाराष्ट्रीय दुकानदार या कामगारांना जास्त पसंती देतात.प्रश्न असा पड़तो की हे कामगार खरेच रोजंदारी साठी आपली घरे सोड़ुन आलेली असतात का ? याची सखोल चौकशी करूनच त्यांना कामावर घेणे गरजेचे आहे.शिर्ड़ी शनीशिंगणापुर या देवस्थानांमुळेनगर मनमाड राज्य महामार्गांवर असणा-या ब-याच हाॅटेल व्यावसायिकांकड़े असे परप्रांतीय कामगार काम करत असतात.त्यांचे मोबाईल नंबर्स स्थानिक पोलीस प्रशासनाकड़े असतील तर अचानक तपासनी मोहीम हे विभाग करत असते का ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
चोरी,दरोड़ा, किंवा गावठी कट्टा असे विविध विषयाशी तपास करताना पोलीस विभागास नाकेनउ येते.परप्रांतीय नागरीक आपल्या आजुबाजुला भाड़ोत्री खोल्या घेउन रहात असतील तर त्याची नोंद प्रत्येक स्थानिक व्यक्तीने करणे गरजेचे आहे .त्यापैकी हे नागरीक खरेच कामे करतात यावर आठवड़्यातुन एकदा त्यांना पोलीस कार्यालयात ओळख परेड़ करून घेणे सुध्दा गरजेचे आहे.त्यांच्या गैरउद्योगांना पायबंद घालुन शहर व परीसर आनंदी राहील याची काळजी घेण्यात यावी असे रहिवासी बोलत आहे.
You might also like
Comments
Loading...