पालघर : मोखाडा तालुक्याच्या मोरचोंडी गावाजवळ, नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प

टीम महाराष्ट्र देशा- आठवडाभरापासून पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या मोरचोंडी गावाजवळ आज पहाटे मोखाडा – नाशिक मार्गावरील एका ओढ्यावरील पूल पावसामुळे वाहून गेल्यानं हा मार्ग बंद झाला आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

मुसळधार पावसामुळे जव्हार-मोखाड्यात पूर आला असून येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मोरचुंडी पुलाच्या बाजूचा रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आल्याने नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मोखाड्यातील ग्रामस्थांचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वेरुळावर डोंगरावरची माती पडल्याने मध्य रेल्वेची इगतपुरी-कसारा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ही वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याचं रेल्वेने स्पष्ट केलंय.Loading…
Loading...